इंदापूरच्या विकास रथाचा सारथी

इंदापूरच्या विकास रथाचा सारथी

Published on

इंदापूर तालुक्यात सध्या जोमात सुरू असलेला विविध भागातील विकास पाहिल्यानंतर या विकास रथाचे सारथ्य करणारे आमचे लाडके नेते दत्तात्रेय भरणेमामा यांची कार्यपद्धती पाहता आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचे स्वाभिमाने उर भरू आल्याशिवाय राहात नाही. मामांनी साधेपणा जपत, प्रत्येकाच्या मनात आपल्या नावाचं घर निर्माण केलं आहे. यासाठी प्रचंड कष्ट, त्याग, समर्पण या गोष्टींमधून तावून-सुलाखून आपलं वेगळं नेतृत्व सिद्ध करत आपल्या नावाची वेगळी छाप पाडली आहे. विजयाची हॅट्रीक करत विकासकामांची गंगा तालुक्यात आणण्याचा मामांचा हातखंडा वाखाणण्याजोगा आहे.
-अॅड. प्रदीप जगताप, सरपंच,
ग्रामपंचायत डाळज क्र. २, ता. इंदापूर


मामा, तुमची समाजाच्या हितासाठी झटण्याची तळमळ आम्ही अगदी जवळून बघितली आहे. सकाळी लवकर सुरू होणारा तुमचा दिवस रात्री उशिरापर्यंत फक्त लोकांची कामे मार्गी लावण्यात घालवता. मग तो युवक आहे का वृद्ध आहे याचा विचार तुमच्या मनात कधीच येत नाही. मामा, तुमची तळमळ असते प्रत्येकाला योग्य न्याय मिळण्यासाठी... यासाठी तुम्ही कधीही लढायला तयार असता. मामा, आपल्या रक्तात असणारी जिद्द आणि स्वाभिमानीपणा कायमच आम्हाला अवाक् करत आला आहे. अखंड माणुसकीचा झरा जपणारं आपलं नेतृत्व कायम असणे हीच तालुक्याची गरज आहे. ''मला मतासाठी राजकारण करायचं नाही तर लोकांच्या प्रश्नांसाठी लढायचं आहे. मतदान तुम्ही कोणाला ही करा, पण जर तुमच्यावर अन्याय झाला तर हा दत्तात्रेय भरणे तुमच्यासाठी लढायला हजारदा तयार आहे'' असं सांगणारा आजच्या राजकारणातला एकमेव नेता म्हणजे आमदार दत्तामामा भरणे हे होय.
राज्याच्या राजकारणात आमदार म्हणून कार्य करण्याची संधी मिळाल्यानंतर अडीच वर्षे राज्यमंत्रीपद तर आता क्रीडा, युवक व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करत असताना त्यांची विकासाची बुलेट ट्रेन सुसाट सुटली आहे. तसे तर त्यांनी छत्रपती कारखान्याचे संचालक, अध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती, तेव्हांपासून समाजातील विविध घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोचविण्याचे कार्य केले आहे. याशिवाय लोकाहिताच्या कामास त्यांनी प्राधान्य दिले आहे. परंतु खरा विकास कसा असतो हे त्यांनी राज्यमंत्रिपद मिळविल्यानंतर तालुक्यातील जनतेला दाखवून दिले आहे. त्यांच्याकडे असलेल्या विविध खात्यांचा कार्यभार, यातून तालुक्यासाठी मिळणारा भरघोस निधी, केवळ एवढ्यावर न थांबता मामांनी मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्याशी स्नेहपूर्ण संबंध निर्माण करून प्रत्येक खात्याचा निधी तालुक्यात खेचून आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

विकास कामांच्या क्रांतीने बदलला तालुक्याचा चेहरा
आता तालुक्याची सहकार, कृषी, उद्योग, व्यवसाय व शिक्षणाच्या माध्यमातून वेगळी ओळख राज्यात निर्माण झाली आहे. या नेतृत्वातील काम करण्याची ऊर्मी आम्हा तरुण कार्यकर्त्यांना अचाट ऊर्जा देणारी आहे. त्यांनी तालुक्यात आजपर्यंत विविध क्षेत्रात घडवून आणलेली विकास कामांची क्रांती तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलण्यात मोलाची ठरली आहे. तालुक्यातील रस्त्याचे जाळे मजबूत करण्याबरोबर, गावागावात पाणी पुरवठा योजना, जलसंधारणाची कामे, सभामंडप यांसारखी कित्येक कामे मार्गी लावली आहेत.

पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यात यश
कधीकाळी दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या या तालुक्यात हरितक्रांती घडविण्यात मामांचा मोठा हातभार आहे. लाकडी-निंबोडी योजनेसारखी कित्येक वर्षांपासून रखडलेल्या योजनेला निधी उपलब्ध करून देत तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. याशिवाय खडकवासला कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रपंचांना सावरण्यासाठी राज्याच्या राजकारणात सक्रिय असताना ठोस उपाययोजना करण्याचा मामांनी दिलेला दिलासा कित्येकांच्या आशा पल्लवीत करणारा आहे. खडकवासला कालव्यालगतच्या शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून यामध्ये त्यांना नक्की यश मिळेल यात शंका नाही. तालुक्यातील
गावागावातील रस्त्यांचेही प्रश्न मार्गी लावण्यात मामांना मोठे यश आले आहे.

आपण स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठीच जगत आलात
तालुक्यातील जनतेशी आपली जुळलेली भावनीक मायेची नाळ आम्ही जवळून अनुभवली आहे. समाजासाठी काम करण्याची तळमळ आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करते. आजपर्यंत आपण कितीतरी दुःखात असणाऱ्या माणसांना आधार देवून सावरले आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत कित्येकांच्या फाटलेल्या संसारांना आधाराची ठिगळं लावली आहेत. आपण कायमच स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठीच जगत आलात. खरचं मामा सोपं नसतं‌......इतरांसाठी जगणं. सोपं नसतं इतरांच्या आनंदात आनंदी होणं. त्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं.. अगदी तुमच्यासारखं...!

आपलं अवघं आयुष्य या समाजासाठी खर्ची घातलेल्या आमच्या लाडक्या नेत्याचा आज वाढदिवस.... आजचा दिवस तुमचा आहे, या तालुक्यासाठी प्रामाणिकपणाने केलेल्या कर्तृत्वाचा आहे. मामा आपणास या वाढदिवसाच्यानिमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा... शतायुषी व्हा..!

02990


.......

..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com