लागवड पद्धत बदलल्यास एकरी १०० टन ऊस उत्पादन शक्य
कळस, ता. १२ : उसाची लागवड पद्धतीत बदल केल्यास एकरी शंभर टनांपर्यंत उत्पादन घेणे शक्य होत असल्याचे प्रतिपादन ऊसतज्ज्ञ तथा कीटक शास्त्रज्ञ डॉ. अशोक चोरमले यांनी केले.
रुई (ता. इंदापूर) येथील इंदापूर तालुका ॲग्रो फार्मर प्रोडुसर कंपनी आणि देहात यांनी संयुक्तीकपणे शेतकऱ्यांसाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी ऊस पिकाच्या उत्पादन वाढीबाबतच्या उपाययोजना व लागवड पध्दतीबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले, ऊस लागवडीची पारंपरिक पद्धत बंद करण्याची गरज आहे. याशिवाय खात्रीशीर भेसळयुक्त बियाण्यांचा वापर, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी पाचट जाळण्याची पध्दत बंद करून हिरवळीच्या खतांचा वापर केला पाहिजे. सुरुवातीला जमिनीचा पोत सुधारण्यावर शेतकऱ्यांनी काम केले पाहिजे. रासायनिक खतांचा अतिवापर बंद करून सल्फर युक्त खतांचा वापर वाढवावा. भविष्यात युरियाच्या भयानक दुष्परिणामांचा सामना करण्याची वेळ येईल. परिणामी शेतकऱ्यांनी युरियाचा बेसुमार वापर बंद करण्याचे आवाहन त्यांनी केले.
लागवड करताना दोन सरीतील अंतर कमीत कमी पाच व जास्तीत जात आठ फूट ठेवावे. माती- परीक्षण करून घेत जमिनीतील कमतरता जाणून घ्यावी. तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीड आणि रोगाची ओळख करून घेत त्याचे व्यवस्थापन करण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
दरम्यान, देहात कंपनीचे व्यवस्थापक अमोल पाटे यांनी मका पीक व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांकडून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देवून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. ॲग्रो फार्मर प्रोडुसर कंपनी वैभव पाटील म्हणाले की, कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढण्यासाठी व पिकांचे संपूर्ण व्यवस्थापन व्हावे यासाठी कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणार आहोत. यातून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण होऊन पिकांचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस मदत होण्याचा हेतू आहे.
कार्यक्रमास देहातचे सुधीर मोरडे, अमरसिंह पाटील, यशवंत कचरे, बापू लावंड, दिलीप मारकड पाटील, अनिल कांबळे, आकाश कांबळे, महादेव माने, विष्णुबाला मारकड पाटील, किरण सरगर, सौरभ पोटफोडे, अंकुश पाटील, वैभव मोरे, अविनाश पालकर उपस्थित होते.
तानाजी मरकड यांनी सूत्रसंचालन केले. तर वृषभ मोहिते यांनी आभार मानले.
03052
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.