पळसदेवला गावगुंडाच्या बंदोबस्तासाठी उपोषण
पळसदेव, ता. १२ पळसदेव (ता. इंदापूर) येथील गावगुंड अप्पा शिंदे याचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शिंदे याच्याकडून गावात दहशत माजवली जात आहे. याबाबत तक्रार करुनही इंदापूर पोलिसांकडून त्याला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत, गुन्हेगारावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच त्याला तडीपार करण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मेघराज पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे.
उपोषणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले, येथील ग्रामस्थ आबा पोंदकुले यांच्या खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेल्या शिंदे याने गावात पुन्हा दहशतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने टोळीच्या माध्यमातून गावात कोयत्याचा वापर करत गावातील व्यावसायिकांमध्ये दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीपूर्वी त्याने गावातील काहींच्या सांगण्यावरून माझ्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य भूषण काळे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या गुन्हेगाराचा कायमचा बंदोबस्त करण्याऐवजी त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न इंदापूर पोलिसांकडून होत असल्याचा आरोप मेघराज पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्याप्रमाणे येथील उजनी धरणामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी शासकीय जागेवर केलेली अतिक्रमणे अधिकृत करावीत. उजनीच्या प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील सदस्य वाढल्याने घरातील प्रत्येक सदस्याला ४ गुंठे भूखंड वाटप करावा आदी मागण्यांसाठी मेघराज पाटील यांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली
दरम्यान, तहसीलदार जीवन बनसोडे यांनी नुकतेच उपोषणकर्ते मेघराज पाटील यांना भेटून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. याशिवाय इंदापूर पोलिसांना संबंधित गुन्हेगारावर कारवाई करण्याची सूचना दिली.
दरम्यान, आंदोलनकर्ते मेघराज पाटील व कर्मयोगीचे संचालक भूषण काळे म्हणाले, आमच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित व गावातील काहींच्या सांगण्यावरून झाला आहे. यासाठी या गुन्हेगाराला गावातील कोणी मदत पुरविली याचे काही पुरावे आमच्याकडे आहेत.
03056
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.