रूई येथील पूल वाहतुकीसाठी धोकादायक

रूई येथील पूल वाहतुकीसाठी धोकादायक

Published on

कळस, ता. १६ ः रूई (ता. इंदापूर) येथील श्री बाबीर मंदिरापर्यंत पोचण्यासाठी भाविकांना खडकवासला कालव्यावरील जीर्ण झालेला पूल ओलांडून जावे लागते. मात्र, हा पूल धोकादायक झाल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
एकीकडे तालुक्यात विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी आल्याचे नेत्यांकडून सांगितले जाते, तर दुसरीकडे भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या पुलासाठी मात्र मागणी करूनही निधी उपलब्ध झाला नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. यामुळे पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी नेत्यांना सद्बुद्धी देण्याबाबत बाबीर चरणी साकडे घालण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
दिवाळी पाडव्याला श्री बाबीर देवाची यात्रा भरते. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी राज्यासह परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक हजेरी लावतात. भाविकांनी खचाखच भरलेली वाहने, विक्रेत्यांची साहित्याची वाहने, पाळण्यांची अवजड वाहने हा पूल ओलांडून मंदिर परिसरात जा- ये करीत असतात. याशिवाय भरगच्च गर्दीने भाविक या पुलावरून मंदिरस्थळी पोचतात. पुणे- सोलापूर महामार्गाला काळेवाडी येथे जोडणारा व पालखी महामार्गाला निमगाव- केतकी येथे जोडणारा प्रमुख रस्ता या पुलावरून जातो. यामुळे हा रस्ता व पूल ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, या पुलाच्या कामासाठी निधी देण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक व भाविक करीत आहेत.

पुलाचा काही भाग कोसळला
दगडी बांधकाम असलेल्या या पुलाचा काही भाग कोसळला आहे. यात काटेरी झुडपे उगवली आहेत. दगडी पुलावर टाकलेले काँक्रिटचे पापुद्रे गळून पडले आहेत. आतील लोखंडी सळई गंजून गेल्या आहेत. एकंदरीत हा जीर्ण झालेला अरुंद पूल धोकादायक बनला आहे. येथे कालव्याची खोली ३० फुटांहून अधिक आहे. यामुळे यात्रा काळात येथे विशेष काळजी घेण्याची गरज आहे. येथे प्रशस्त व मजबूत पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

03133, 03134

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com