शेतीमाल प्रकिया उद्योगातून उद्योजक बनण्याची संधी
कळस, ता. २९ : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारता येतो. अशा प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीमालाला चांगला बाजारभाव देण्याबरोबर शेतकरी, महिला व युवकांना उद्योजक बनण्याची संधी आहे. यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून उद्योजक व्हावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे तालुका इंदापूर कृषी अधिकारी दीपक गरगडे यांनी केले.
पीएमएफएमई अंतर्गत रुई (ता. इंदापूर) येथे शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) यांनी संयुक्तीकपणे आयोजित केलेली कार्यशाळा नुकतीच पार पडली.
यावेळी कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी किरण पिसाळ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय बोडके, उपकृषी अधिकारी गोपाळ खंडागळे, सहाय्यक कृषी अधिकारी गणेश देवडे, कर्मवीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पाटील, बाबीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे वैभव पाटील, मोहन लावंड, अप्पा लावंड, अंकुश पाटील, अनिल कांबळे, सतीश झेंडे, तानाजी मारकड, विलास गावडे, विनोद कांबळे यांसह शेतकरी व कृषी सखी महिला बचत गटातील महिला सदस्या उपस्थित होते.
कृषी अधिकारी गरगडे पुढे म्हणाले, पारंपरिक शेतीला फाटा देवून आता शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून शेती व्यवसायाला पूरक व्यवसायाची जोड देण्याची गरज आहे. पीएमएफएमई योजनेत सहभागी होऊन शेतकऱ्यांनी कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी करावी. डाळ मिल, ऑइल मिल, पशुखाद्य निर्मिती यांसारख्या अनेक प्रकारच्या उद्योगांची उभारणी करता येवू शकते. प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून सर्वोतपरी मदत केली जाईल.
यावेळी किरण यांनी महाडीबीटी, महाविस्तार ए आय ॲप व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. एचडीएफसी बँकेचे बिरू जानकर यांनी कृषिविषयक योजनांमध्ये बँकेचे साहाय्य या विषयावर मार्गदर्शन केले.
वैभव पाटील यांनी सूत्रसंचालन तर तानाजी मारकड यांनी आभार मानले.
03158
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

