श्री हरणेश्वरच्या मूर्तीची ग्रामप्रदक्षिणा

श्री हरणेश्वरच्या मूर्तीची ग्रामप्रदक्षिणा

Published on

कळस, ता. १५ ः महाशिवरात्रीनिमित्त कळस (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत श्री हरणेश्वर मंदिरात आज पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी रांगा लावून शिस्तबद्ध पद्धतीने हरणेश्वराचे दर्शन घेतले.
महाशिवरात्रीनिमित्त पहाटे श्री हरणेश्वर, श्री काशी विश्वेश्वर, श्री कांडेश्वर, श्री रामेश्वर, श्री खुलेश्वर, श्री सिद्धेश्वर व श्री नागेश्वर या ऐतिहासिक सातश्वरांच्या शिवलिंग मंदिरांमध्ये अभिषेक, महापूजा व महाआरती झाली. यानंतर श्री हरणेश्वर मूर्तीची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आल्याने मंदिराचे रूप खुलले होते. भाविकांना सकाळी खिचडी महाप्रसाद व फळांचे वाटप करण्यात आले.
यावेळी बारामतीच्या प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाने मंदिरात आध्यात्मिक चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून श्री हरणेश्वर महादेवाची माहिती दिली. सायंकाळी युवा प्रवक्ते अक्षय महाराज पिंगळे (बीड) यांच्या कीर्तनाचे व रात्री जागर आयोजित केला होता.
दरम्यान येथील मंदिर परिसरात वृक्षारोपण करुन संवर्धनाचा संकल्प गावातील तरुणांनी केला. ग्रामदैवत हरणेश्वर हे चिंकारा हरणांशी संबंधित असल्याने येथे हरणांना अभय आहे. यामुळे ग्रामदैवताच्या माध्यमातून निसर्ग देवतेचे संवर्धन काळाची गरज असल्याने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com