पळसदेवमधील विद्यालयात पोवाडा सादर
पळसदेव, ता. १९ ः पळसदेव (ता. इंदापूर) येथील एल. जी. बनसुडे विद्यालयात गुरुवारी (ता. १९) शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी पोवाडा सादर केला. शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये उत्कृष्ट निबंध व वक्तृत्व सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गीता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास दादा मुलाणी, सचिव नितीन बनसुडे, विभाग प्रमुख ज्योती मारकड, सीमा बाराते, तेजस्विनी तनपुरे, तनुजा फुगे, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे आदी उपस्थित होते.
यावेळी अंशिका सूर्यवंशी हिने शिवाजी महाराजांचे पाळणा गीत सादर केले. प्राचार्या वंदना बनसुडे व मुख्याध्यापक राहुल वायसे यांनी शिवचरित्रपटाचे सादरीकरण करून शिवाजी महाराजांच्या शौर्य, धैर्य व नेतृत्व गुणांची माहिती दिली. सुनील बांडे यांनी विद्यार्थी व पालकांना शिवाजी महाराजांच्या आदर्श आचरणाने अनुकरण करण्याचा सल्ला दिला.
सांस्कृतिक विभागाच्या शिक्षिका अर्चना बोंद्रे, शीतल झणझणे यांनी इतर सहकारी शिक्षकांच्या माध्यमातून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या पोटे यांनी केले. प्रवीण मदने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

