कळसमधील आगीत वनसंपदा खाक

कळसमधील आगीत वनसंपदा खाक

Published on

कळस, ता. २२ : कळस (ता. इंदापूर) येथील वनक्षेत्रामध्ये लागलेल्या आगीत वनातील वाळलेले गवत, झाडे व वन्यजीवांना मोठा फटका बसला. येथील बिरंगुडीवाडीलगतच्या वन क्षेत्रामध्ये रविवारी (ता.२२) दुपारी १२ वाजता लागलेल्या आगीत वनातील वाळलेले गवत जळून खाक झाले.
आगीमुळे वनातील मोठ्या झाडांना व लहान सरपटणाऱ्या वन्यजीवांना मोठी झळ बसली. या आगीमुळे वनसंपदा व जैवविविधतेला मोठा फटका बसला आहे. वनविभागाने वणव्यांचे धोके लक्षात घेवून, उपाययोजना राबविण्याची मागणी वन्यप्रेमींमधून होत आहे.
कळस-जंक्शन रस्त्यालगत असलेल्या वनक्षेत्रात आग लागली होती. या आगीचा सर्वाधिक फटका लहान वन्यजीवांना बसला आहे.
प्राथमिक अंदाजानुसार ही आग मानवनिर्मित असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणि वाळलेल्या गवतामुळे आग वेगाने पसरली.
दरम्यान तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर वनपाल ज्ञानदेव ढेंबरे यांनी बिडी पिणाऱ्यानी टाकलेल्या थोकटांमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला. सदर आगीत सुमारे एक एकर वनक्षेत्राला फटका बसल्याचे त्यांनी सांगितले.

जाळ पट्टे कधी?
इंदापूर तालुक्यात सुमारे साडेसहा हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्र आहे. यामध्ये विविध प्रकारची लहान-मोठी झाडे आहेत. येथे चिंकारा, ससे, तरस, लांडगे, कोल्हे, घोरपड, सरडे, टिटवी, मोर, बगळे, कावळे यांसारखे अनेक प्रकारचे जीव वास्तव्यास आहेत. रस्त्याने प्रवास करणारे धूम्रपान केल्यानंतर जळती बीडी-काडी या गवतात टाकतात. यामुळे आग लागण्याचे प्रकार घडतात. यात वनसंपदेचे नुकसान होते. वनविभागाने जाळपट्टे तयार करून आगीच्या घटना रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे वन्यप्रेमी व्यक्त करत आहेत.

03425

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com