कळसमध्ये 
दुकाने बंद

कळसमध्ये दुकाने बंद

Published on

कळस, ता. २३ : सकल हिंदू समाजाने दिलेल्या इंदापूर तालुका ‘बंद’च्या हाकेला कळस ग्रामस्थांनी प्रतिसाद देत गावात कडकडीत बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळता गावातील व्यापारी, व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदविला. रविवारी दिवसभर समाजमाध्यमावर सकल हिंदू समाजाच्यावतीने बंद पाळण्याचे जाहीर केले होते. यानंतर सोमवारी सकाळी व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून सदर घटनेचा निषेध नोंदविला. बंद दरम्यान अनुचित घटना घडू नये, याची खबरदारी म्हणून वालचंदनगर पोलिसांनी येथे दिवसभर बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com