त्यांना आमच्या मातीवर फिरकू देणार नाही
पळसदेव, ता. २८ - : ज्यांचा कधी शेणात हात नाही, ज्यांनी कधी मातीवर हात फिरवला नाही अशांना आमच्या मातीवर फिरकू देणार नसल्याचा इशारा आमदार तथा शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिला.
उजनी धरणासाठी संपादीत असलेल्या अतिरिक्त जमिनी उद्योगपतींना देण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयास विरोध दर्शविण्यासाठी सध्या उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीच्यावतीने पुर्नवसन गावांमध्ये मेळावे आयोजित करत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. पळसदेव (ता. इंदापूर) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शुक्रवारी (ता. २७) संध्याकाळी धरणग्रस्त शेतकरी व मच्छीमार मेळावा पार पडला. त्यावेळी खोत बोलत होते. यावेळी प्रा. सुहास पाटील, नीलेश देवकर, अरविंद जगताप, भूषण काळे, अंकुश पाडुळे, महेंद्र पाटील, बंडू ननवरे, प्रवीण काळे, श्रीकांत पाडुळे, हनुमंत बनसुडे, गजानन जगताप, मकरंद जगताप, अनिल सूर्यवंशी, निळकंठ शिंदे, बंडोपंत काळे, रामदास बांडे, अभिमन्यू शिंदे, हिराचंद काळे, विठ्ठल बनसुडे, गजानन गांधले, सतीश मोरे, सखाराम खोत आदी उपस्थित होते.
आमदार खोत पुढे म्हणाले, उजनी धरणग्रस्तांची एक इंचही जमीन उद्योगपतींना देवू देणार नाही. पर्यटन उभारणीच्या नावाखाली जमिनी घ्यायच्या असतील, तर त्यात शेतकऱ्यांना सामावून घ्या. उद्योगपतींपेक्षा चांगली पर्यटन सेवा शेतकरी पुरवतील, असे त्यांनी नमूद केले.
मंत्रालयात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बुधवारी बैठक
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्याशी या विषयावर बोलणे झाल्यानंतर त्यांनी प्रश्नावर तोडगा काढण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. बुधवारी (ता. ४) मंत्रालयामध्ये यावर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रित येत राजकीय जोडे बाजूला ठेवून या बैठकीत सहभागी होण्याची गरज आहे. सरकारने सकारात्मकता दाखवून एक पाऊल पुढे टाकले आहे, तर आपण शेतकऱ्यांनी चार पावले पुढे येण्यास काहीच हरकत नाही. हे शेतकऱ्यांच्या लढ्याचं यश असून, चर्चेतून मार्ग काढणे आवश्यक असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

