

कळस, ता. २१ : ‘‘मका उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याचे इंदापूर ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आगामी खरीप हंगामासाठी कंपनीने सर्व प्रकारची तयारी पूर्ण केली आहे. दर्जेदार खते, औषधे व बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची टंचाई भासणार नाही,’’ अशी खात्री कंपनीचे संचालक वैभव पाटील यांनी दिली.
रुई (ता. इंदापूर) येथे एलोरा नॅचरल सीड्स आणि इंदापूर तालुका ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीने मका पीक फणी (पोषण व्यवस्थापन) कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. या वेळी मार्गदर्शन करताना पाटील यांनी येणाऱ्या खरीप हंगामाबाबत नियोजनाची माहिती देत शेतकऱ्यांना आश्वासीत केले. एलोरा नॅचरल सीड्सचे देविदास शिंदे यांनी मका उत्पादन व व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. योग्य बियाणे निवड, संतुलित खत व्यवस्थापन, तसेच कीड व रोग नियंत्रणाबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे समाधान करत, सध्याच्या जागतिक परिस्थितीचा मका किमतीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी लिंगेश्वर लवटे, इंदापूर ॲग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ पोटफोडे, प्रगतशील शेतकरी किरण सलगर यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.