

कळस, ता. २३ : कळस (ता. इंदापूर) येथे महिनाभरापासून ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील पाणी पुरवठा विहिरींलगतचा तलाव कोरडा पडल्याने, विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठला आहे. परिणामी गावातील अंतर्गत पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली आहे. यामुळे ग्रामस्थांना काही दिवसांपासून टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी चार वर्षांपूर्वी ‘हर घर जल’ योजनेतून सुमारे २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी गावाला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, गावातील प्रत्येकाच्या घरी स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ‘हर घर जल’ योजनेतून सुमारे २९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र या योजनेचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले नसल्याने, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
येथील तलावालगत ग्रामपंचायतींच्या तीन विहिरी आहेत. त्यातून गावाला अंतर्गत पाणीपुरवठा केला जातो. मात्र या विहिरी कोरड्या पडल्याने, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना आता खासगी पाणी विक्री करणाऱ्या टँकरच्या पाण्याचा आधार आहे.
सध्या गावातील ५ व्यक्तींच्या कुटुंबाला दैनंदिन वापरासाठी किमान ३०० लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र दररोज पाणी विकत घ्यावे लागत असल्याने ते परवडत नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. ‘हर घर जल’ योजनेतून पाणी पुरवठा सुरु होऊन परिस्थिती सुधारण्याची ग्रामस्थांना आशा होती. मात्र या योजनेच्या कामाची गती पाहता, प्रत्येकाच्या घरी शुद्ध जल पोचण्याची आशा मावळली असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
ग्रामस्थांचे म्हणणे
- योजना राबविताना जीवन प्राधिकरणाकडून ग्रामपंचायतीला पूर्णपणे अंधारात ठेवले.
- ठेकेदाराने किती काम पूर्ण केले आहे, यासाठी किती निधी खर्च झाला याची कोणतीही माहिती ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही.
- ‘हर घर जल’ योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याबरोबर, गावात पर्यायी पाणी पुरवठा सुरु करण्याची मागणी
गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी पत्राव्दारे पंचायत समितीकडे केली आहे. याशिवाय पाणी पुरवठा विहिरींलगत विंधनविहीरींची खोदाई करून विहीरीत पाणी सोडण्याचे नियोजन आहे. यानंतर काहीअंशी पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. याशिवाय तलावात खडकवासला कालव्यातून पाणी सोडल्यास काही दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल.
- सविता सुरेश खारतोडे, प्रभारी सरपंच, कळस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.