

कानगाव, ता. ३० : चिकुनगुणीया आणि डेंगी सदृश आजारांनी कानगावमधील नागरिक हैराण झाले आहेत. चिकुनगुणीया आणि डेंगीसारख्या या आजारी रुग्णांची संख्या वाढत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिकुनगुणीया आणि डेंगी ५०० हुन अधिक रुग्ण कानगाव व मांडवगण याठिकाणी खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.
कानगाव परिसरामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे. अनेक ठिकाणी गवत आणि खराब पाण्याची डबकीही वाढलेली आहेत. डासांच्या उपद्रवामुळे डेंगी व चिकुनगुणीया सदृश आजाराने त्रस्त आहेत. ताप आल्यानंतर पायांच्या सांध्यांच्या व्याधीमुळे तर अक्षरश: परिसरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमिवर कानगाव ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गावामध्ये सर्वत्र डास प्रतिबंधक फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण काम जोरात सुरू आहे. गावामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता ग्रामपंचायतीने वेळीच पावले उचलली आहे, असे सरपंच राहुल चाबुकस्वार यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीच्यावतीने डेंगी-चिकुनगुणीयाने या आजारावर जनजागृती सुरू असून जंतुनाशक पावडर फवारणी फॉगिंग मशिनने धुरळणी करण्याचे काम सुरू आहे.
- विठ्ठल कोऱ्हाळे, ग्रामपंचायत सदस्य, कानगाव
कानगाव उपकेंद्राची टीम व आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन चिकुनगुणीया आणि डेंगी आजारावर नागरिकांमध्ये जनजागृती व उपाययोजना करण्याबाबत सर्व्हे करत आहेत. तसेच आढळलेल्या रुग्णांना गोळ्या देऊन औषधोपचार करत आहोत.
- दीपाली क्षीरसागर, आशा सेविका कानगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.