‘हडपसर ते कानगावपर्यंत बससेवा सुरू करा’

‘हडपसर ते कानगावपर्यंत 
बससेवा सुरू करा’
Published on

कानगाव, ता.२८ : हडपसर (पुणे) ते कानगावपर्यंत बससेवा सुरू व्हावी, यासाठी कानगावचे सरपंच राहुल चाबुकस्वार यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यासंदर्भातील निवेदन (ता.२२) रोजी ‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापक व दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांना देण्यात आले आहे. सध्या पीएमपीएमएल बससेवा ही हडपसर (पुणे) ते वरवंडपर्यंत सुरू आहे. ही बससेवा पुढे वरवंडवरून पाटसमार्गे कानगावला करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या सेवेमुळे कानगाव पंचक्रोशीतील नागरिक तसेच विद्यार्थ्यांना दररोज पुण्याला ये-जा करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com