दौंडमध्ये वाढला तापमानाचा पारा

दौंडमध्ये वाढला
तापमानाचा पारा
Published on

कानगाव, ता. १० : दौंड तालुक्यात तापमानाचा पारा वाढला असून, सुमारे ४० ते ४१ अंश सेल्सिअसवर तापमान गेल्यामुळे सर्वच जण हैराण होत आहेत. उष्मघाताचाही धोका वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. अशा स्थितीत सर्वांनीच व्यक्तिगत काळजी घेणे गरजेचे ठरत आहे.
या वर्षी दौंड तालुक्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कडक उन्हाळा जाणवू लागला असल्यामुळे दुपारी अंगाची लाही लाही होत आहे. यामुळे नागरिकांनी महत्त्वाची कामे सकाळी ७ ते ११ या वेळेत उरकून घ्यावीत. तसेच, दुपारनंतर ४ ते ७ या वेळेत कामे करावीत. शक्यतो दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत सावलीत असणारीच कामे करावीत.
लहान लहान मुलांना वयोवृद्धांना व सर्वांनीच शुद्ध व भरपूर पाणी प्यावे. शक्यतो सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळावे, जास्तीत जास्त फळे, फळांचा रस , उसाचा रस, ताक आणि हिरव्या पालेभाज्या खाण्याला प्राधान्य द्यावे. बाहेर उन्हात जायचे काम पडल्यास डोक्याला रुमाल बांधून किंवा टोपी, स्कार्फचा वापर करूनच प्रवास करावा. जेणेकरून उष्मघाताचा त्रास होणार नाही, असे येथील डॉ. नवनाथ तोंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com