कानगाव परिसराला अवैध दारू धंद्याचा विळखा

कानगाव परिसराला अवैध दारू धंद्याचा विळखा

Published on

कानगाव, ५ : कानगाव (ता. दौंड) परिसराला अवैध दारू धंद्यांचे ग्रहण लागले आहे. अवैध दारू धंदे चांगले तेजीत सुरू आहेत. या परिसरात बेकायदा देशी- विदेशी, गावठी दारूची विक्री राजरोसपणे खुलेआम सुरू आहे. सध्या या परिसराला अवैध व्यवसायांचा विळखा पडला आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. मात्र, याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे मत आहे.
कानगावमध्ये मोठ्या प्रमाणात परिसरातील ग्रामदेवतेच्या कुंपणालगतच नाश्त्याच्या हॉटेलमध्ये, तसेच गावामधील असणाऱ्या जेवणावळीच्या हॉटेलमध्ये जेवणाच्या नावाखाली अवैध दारू विक्री सुरू आहे. या अवैध दारू धंद्यामुळे कानगाव व मांडवगण परिसरातील तरुण युवक वाममार्गाला लागत आहेत. त्यामुळे कित्येक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तरी पोलिस प्रशासन गप्प का? असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत.

कानगाव परिसरातील अवैद्य धंद्याची माहिती मिळाली आहे. या अवैद्य धंद्यावर लवकरात लवकर कारवाई करून बंदोबस्त करण्यात येईल.
- नारायण देशमुख, पोलिस निरीक्षक, यवत

कानगाव परिसरातील अवैद्य व्यवसायिकांना वारंवार धंदे बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. पोलिसांमार्फत छापा टाकत आहे. मात्र, दोन- चार दिवस बंद करून परत हे धंदे सुरू होत आहेत.
- विठ्ठल बारवकर, पोलिस पाटील, कानगाव

Marathi News Esakal
www.esakal.com