पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
कानगाव, ता. २० : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे इयत्ता दहावीची परीक्षा शुक्रवार पासून (ता. २०) सुरू झाली. यावेळी तालुक्यातील ११ केंद्रावर एकूण ४३८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संजय महाजन यांनी दिली. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी सर्व केंद्रावरील प्रत्येक वर्ग खोल्यांमध्ये व केंद्रांच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत कोणत्याही केंद्रावर कॉफीचे प्रकार घडू नयेत यासाठी उपाययोजना केल्याची माहिती महाजन यांनी दिली.
दौंड तालुक्यातील नागेश्वर विद्यालय पाटस या ठिकाणी ३७७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांच्या वतीने व पालकांच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
या केंद्रामध्ये पाटस येथील नागेश्वर विद्यालय पाटस, कै. एम. व्ही. भागवत विद्यालय पाटस, श्री भानोबा विद्यालय कुसेगाव, गुरुकृपा विद्यालय वासुंदे, मेरी मेमोरियल स्कूल पाटस व अंबिका पब्लिक स्कूल पाटस येथील विद्यार्थी बसले आहेत. विद्यालयातील १७ वर्ग खोल्यांतून विद्यार्थ्यांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे वर्ग खोल्यांमध्ये वीज व पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून परीक्षार्थींना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नसल्याची खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती केंद्रप्रमुख आबासाहेब खारतोडे व उपकेंद्र संचालक उत्तम रूपनवर यांनी दिली. यावेळी परीक्षकावर कोणतेही गैरवर्तन होऊ नये यासाठी यवत पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचारी तैनात केले होते.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य नामदेव शितोळे, पाटस केंद्राचे केंद्र संचालक आबासाहेब खारतोडे तसेच उपकेंद्र संचालक उत्तम रूपनवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

