

गणेश सुळ : सकाळ वृत्तसेवा
कानगाव, ता. २६ : पाटस (ता. दौंड) येथील शेतकरी औदुंबर अरुण भागवत यांनी मुरमाड माळरानावर केलेला ‘नीरा’ लागवडीचा प्रयोग जिल्ह्यात लक्षवेधी ठरत आहे. त्यांनी तीन एकर क्षेत्रात सिंधी ऊर्फ ताडीच्या झाडांची लागवड केली व दरवर्षी एकरी तीन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळवले.
भागवत यांनी सन २०१६ मध्ये डहाणू येथून सिंधीची रोपे आणून १० बाय १० अंतरावर लागवड केली. ठिबक सिंचनाचा वापर करून झाडांचे संगोपन केले. ती उत्पादनक्षम होण्यासाठी सहा ते सात वर्षांचा कालावधी लागतो.
६ ते ७ वर्षे........उत्पादनक्षमतेसाठीचा कालावधी
२ ते ३ लिटर.... दररोज प्रत्येक झाडातून मिळते नीरा
७० ते ८० वर्षे ..... उत्पादनाचा कालावधी
कमी खर्चात जास्त उत्पन्न
औदुंबर भागवत यांनी ताडीच्या झाडांमध्ये आंतरपिके घेत उत्पन्नाचा स्रोत कायम ठेवला. सात वर्षांनंतर झाडांची पूर्ण वाढ झाल्यावर नीराचे उत्पादन सुरू झाले. विशेष म्हणजे या झाडांसाठी मोठ्या प्रमाणात खत, खुरपणी किंवा अतिरिक्त देखभाल खर्च लागत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असे समीकरण तयार झाले आहे.
पहाटेचा गोड व्यवसाय
- दररोज संध्याकाळी चार ते पाचच्या सुमारास झाडांना मडकी बांधली जातात.
- रात्रभर झाडातून नीराचे थेंब मटक्यात साचत राहतात.
- पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत मडकी भरतात.
- ताजी, थंडगार नीरा सकाळी सहा वाजेपर्यंत पुणे बाजारपेठेत पाठविली जाते
नीराचे आरोग्यदायी फायदे
- उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते
- डिहायड्रेशन कमी करण्यास मदत
- नैसर्गिक साखरेमुळे त्वरित ऊर्जा मिळते
- पचनक्रिया सुधारते, अम्लपित्त व गॅस कमी होतो
- पोटॅशियममुळे हृदयासाठी लाभदायक
- अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते
झाडाचेही बहुपयोगी महत्त्व
- मुरमाड व माळरान क्षेत्रातही ही झाडे चांगली वाढतात
- झाडांच्या झावळ्यांपासून केरसुणी तयार होते
- नीरापासून शुद्ध सेंद्रिय गूळही तयार होतो
नीरा शेती ही शाश्वत शेतीकडे नेणारा प्रभावी मार्ग आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी ही शेती पारंपरिक पिकांना उत्तम पर्याय ठरत आहे. सध्या नीरा शेती कमी प्रमाणात असल्याने बाजारपेठेत मागणी मोठी असून उत्पन्नाची हमीही निश्चित आहे.
- औदुंबर भागवत, नीरा उत्पादक
14994
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.