थेऊर येथे उलटले बोअरवेलचे वाहन

थेऊर येथे उलटले बोअरवेलचे वाहन

केसनंद, ता.२३ : लोणीकंद (ता. हवेली) येथे थेऊर फाटा वळणाला कोरेगाव भीमाकडे येणाऱ्या बाजूला व रस्त्याच्या मध्यभागी बोअरवेलची गाडी उलटल्याने वाहनांच्या रांगा लागून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
लोणीकंद येथील थेऊरफाटा चौकात बोअरवेलची गाडी उलटल्याने सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. सकाळची वेळ असल्याने कंपनी कामगार, प्रवासी, विद्यार्थी यांना मात्र वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. लोणीकंद पोलिसांनी व ग्रामस्थांनी तातडीने क्रेनच्या साहाय्याने बोअरवेलची गाडी बाजूला घेतली. मात्र तोपर्यंत दोन्ही बाजूला दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, सकाळी झालेल्या अपघातानंतर रस्त्यावर सांडलेले ऑइल वाहतूक शाखेचे पोलिस तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचे फवारे मारून स्वच्छ केले तसेच रस्ताही मोकळा केला. सायंकाळी उशिरापर्यंत अपघाताबाबतचा तपशील पोलिसांकडून मिळू शकला नाही.


04240

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com