हुमणी नियंत्रण करण्यासाठी कोरेगावात औषधाचे वाटप

हुमणी नियंत्रण करण्यासाठी कोरेगावात औषधाचे वाटप

Published on

कोरेगाव भीमा, ता. २ : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकरी बांधवांना हुमणी नियंत्रणासाठी मोफत औषधाचे वाटप करण्यात आले तसेच शेतकऱ्यांकरीता मोफत कंपोस्ट खतही उपलब्ध असल्याचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी जाहीर केले.
कृषी विभाग तसेच कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या आयोजित केलेल्या मेळाव्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शेतकरी संदीप घोले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना लागवडीपासून ते ऊस तोडणीपर्यंतचे मार्गदर्शन केले. यात ऊस पिकासाठी आवश्यक जमीन व लागवडीचे प्रमाण, जमिनीचे आरोग्य, औषधे वापराची पद्धत, ऊस पिकात वाढणाऱ्या गवतावर उपाय, कीडनियंत्रण व उपाय, औषधे, बेसल डोस, खतमात्रा, पाणी व्यवस्थापन, हुमणी व खोडकीड नियंत्रण यासह बारकावे घोले यांनी सांगितले. तसेच उपस्थित शेतकऱ्यांचे शेतीबाबतचे विविध प्रश्न व अडचणींचेही समाधान केले.
पंचायत समितीचे माजी सदस्य पी.के.अण्णा गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात कृषी अधिकारी प्रशांत दोरगे, उपसरपंच सविता घावटे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, राजाराम ढेरंगे, पंडित ढेरंगे, विलास खैरमोडे, संजय काशीद, शरद ढेरंगे, वंदना गव्हाणे, रेखा ढेरंगे, जयश्री गव्हाणे, संदीप किसन ढेरंगे, ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत दोरगे यांनी सूत्रसंचालन केले तर अमोल गव्हाणे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.