कोरेगाव भीमा येथे पोलिसांचे संचलन

कोरेगाव भीमा येथे पोलिसांचे संचलन
Published on

कोरेगाव भीमा, ता. १५ : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील बाजार मैदानात शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सशस्त्र पोलीस संचलन व दंगा नियंत्रण करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत बाजार मैदान, विघ्नहर्ता चौक, होळकर वाडा, लिंब चौक, भैरवनाथ मंदिर चौक, आदर्श चौक, दोस्ती चौक ते पोलीस चौकी आदी ठिकाणी पोलिस संचलन करण्यात आले. या सशस्त्र पोलिस संचलन प्रसंगी जमाव नियंत्रणात आणणे, लाठीचार्ज व अश्रू धुराच्या नळकांड्यांचा वापर तसेच जखमी झालेल्या नागरिकांना सुरक्षित नेण्याचा सरावही करण्यात आला. गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या संचलनात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, रोहिणी सोनावले, पोलिस उपनिरीक्षक पंडित मांजरे, पोलिस हवालदार संदीप कारंडे व ४२ पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे, ग्रामपंचायत सदस्य महेश ढेरंगे, माजी संचालक कैलास सोनवणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, विक्रम गव्हाणे, माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश गव्हाणे पाटील, भाजपचे संपतराव गव्हाणे, मधुकर कंद, नितीन पोपट गव्हाणे आदी उपस्थित होते.

04437

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com