मतदारसंघात अंदाज घेण्यासाठी
राजकीय चर्चांना उधाण

मतदारसंघात अंदाज घेण्यासाठी राजकीय चर्चांना उधाण

Published on

केसनंद, ता. १७ : विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू असून उमेदवारांकडे अखेरचा एकच दिवस उरला आहे. मोठी लोकसंख्या असलेल्या गावांत पदयात्रा, प्रचारफेऱ्या काढून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यांकडे शिरूर-हवेलीत उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत सध्या कोणाची हवा आहे, याचा अंदाज घेण्यासाठी अगदी मॉर्निंग वॉकपासूनच रात्री उशिरापर्यंत चौका-चौकात, चहाच्या टपऱ्यांवर नागरिकांमध्ये राजकीय चर्चा रंगत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची उद्या सायंकाळी सांगता होणार आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत पाहोचण्यासाठी शिरूर-हवेलीत राजकीय पक्षांचे नेते तसेच उमेदवारांच्या प्रचार सभा, पदयात्रा सुरू आहेत. ग्रामीण भागामध्ये वाड्या-वस्त्यांच्या तुलनेत एकाच ठिकाणी जास्त मतदारांच्या संपर्कासाठी मोठ्या मतदार संख्येच्या भागातील मतदारांच्या संपर्कासाठी उमेदवारांनी पदयात्रा, प्रचार फेऱ्यांवर भर दिला आहे. तसेच स्थलांतरित मतदार, बाहेर गावी गेलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदानासाठी परत आणण्यासाठी कार्यकर्त्यांकडून नियोजन केले जात आहे. एकूणच आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत करीत आहेत.

सध्या हवा कोणाची?
विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना शिरूर हवेलीत सकाळपासून रात्रीपर्यंत ठिकठिकाणी अगदी गावातल्या टपरी व गल्लीबोळापासून शहरातील हॉटेल व चहाच्या कट्ट्यावरही सर्वत्र निवडणुकीवरच चर्चा सुरू आहे. तुमच्याकडे कुणाची हवा?, आपल्या मतदारसंघात येणार कोण?, कोणाचे पारडे जड?, अशा चर्चा रंगत आहे. तसेच राज्यात सत्तांतर होणार की पुन्हा महायुतीलाच संधी मिळणार इथपासून ते आपल्या मतदार संघात कोण निवडून येणार? अशा चर्चांना उधाण आले आहे. आपल्याच उमेदवाराची बाजू वरचढ कशी, हेही पटवून देण्यासाठीही समर्थक कार्यकर्त्यांकडून जोर लावला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com