विजयस्तंभस्थळी सुविधा पुरवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

विजयस्तंभस्थळी सुविधा पुरवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Published on

कोरेगाव भीमा, ता. ३ : येत्या एक जानेवारीला पेरणेफाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक विजयस्तंभस्थळी अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व बांधवांना सकारात्मक वातावरणात सर्व सोयी सुविधा पुरवण्याचे निर्देश प्रशासनाला देतानाच स्थानिक नागरिकांसह सर्व घटकांच्या सहभागातून अभिवादन दिन कार्यक्रम यशस्वी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.

पेरणे (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी सर्व विभागांचे नियोजन व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पेरणे येथे विजयस्तंभस्थळी घेण्यात आली. यावेळी त्यांच्यासमवेत बार्टीचे महासंचालक सुनील वारे, पुण्याचे सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिम्मत जाधव, विशेष शाखेचे उपायुक्त मिलिंद मोहिते, तसेच जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, शिरूर व हवेलीचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पेरणे ग्रामपंचायत व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी व उपस्थितांनी पेरणे व कोरेगाव भीमा परिसरात वाहनतळ व सुविधांची पाहणी केली.
विजयस्तंभास अभिवादन करण्यास येणाऱ्या नागरिकांना प्रशस्त रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, विद्युत प्रकाश व्यवस्था, वाहनतळ, सुरक्षा व आरोग्य सोयीसुविधा सहज दिसतील व सुलभपणे मिळतील, यादृष्टीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या नावासह माहितीचा क्युआर कोडद्वारे विविध माध्यमातून प्रचार प्रसार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच गर्दी व वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासह विजयस्तंभ परिसर, डागडुजी व सजावटीविषयीही आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना सूचनाही दिल्या.

दरम्यान अभिवादन कार्यक्रमासाठी विविध सोयीसुविधा पुरवण्यासाठी पेरणे ग्रामपंचायतीला निधी तसेच पेरणेफाटा व्हीआयपी रस्ता दुरुस्ती व ड्रेनेजची मागणी सरपंच उषा दशरथ वाळके, ग्रामविकास अधिकारी गोपीनाथ थोरात व पदाधिकाऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com