विजयस्तंभ अभिवादनाची जय्यत तयारी
कोरेगाव भीमा, ता. ११ : पेरणे (ता. हवेली) येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी १ जानेवारी ला मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या जनसमुदायाच्या वाहनांकरिता तात्पुरत्या स्वरूपात वाहनतळ उभारण्यासाठी खासगी मालकीच्या मोकळ्या जागा तात्पुरत्या स्वरूपात २७ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ पर्यंत अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय खासगी वाहनाने तसेच सार्वजनिक वाहनाने येत असतो. विजयस्तंभाजवळ मोठी गर्दी होऊ नये, यासाठी लोणीकंद, पेरणे, वढू खुर्द हद्दीतील काही मोकळ्या जागांमध्ये येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यात येते. तसेच पीएमपीएमएलच्या बसेस थांबण्याकरिता तात्पुरते बसस्टॉप उभारण्यात येतात. या विविध ठिकाणच्या पार्किंगसाठी तसेच या कार्यक्रमाच्यावेळी विजयस्तंभ परिसरात अनुचित प्रकार घडून आल्यास तत्काळ बाहेर जाण्याकरिता विजयस्तंभाच्या बाजूला असलेली जागा अतितातडीची बाहेर पडण्याची (इमर्जन्सी एक्झिट) म्हणून तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहीत करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी डॉ. दिवसे यांनी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ६५ अन्वये खासगी जागा अधिग्रहीत करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार लोणीकंद, वढू खुर्द, फुलगाव आणि पेरणे येथील मोकळ्या जागा अनुयायांच्या वाहनांच्या पार्किंगकरिता अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. पीएमपीएमएल पार्किंगसाठी लोणीकंद तर बुकस्टॉलकरिता पेरणे येथील मोकळ्या जागा अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. याशिवाय पेरणे येथील सरकारी गायरानाची जागा अतिरिक्त जमीन असेल.
येथे होईल पार्किंग
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पेरणेमधील जागा तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहीत करण्यात येणार आहे. अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था वक्फ बोर्ड पार्किंग, जीत ढाब्यासमोर, पुणे नगर हायवेवर, शिक्रापूर, तोरणा पार्किंग बजरंगवाडी, शिक्रापूर, टोरांटो गॅस, खालसा पंजाबी ढाबा, चौधरी ढाबा, जातेगाव खुर्द, शंभू महादेव तळेगाव ढमढेरे, कृष्णलीला मंगल कार्यालय, सणसवाडी, कोरेगाव भीमा बाजारतळ, इनामदार पार्किंग कोरेगाव भीमा, क्रिशा होंडा शोरूम ड्रॉप पॉइंट कोरेगाव भीमा, हॉटेल ग्रीन गार्डन पिकअप पॉइंट कोरेगाव भीमा, वढू बु., हॉटेल वहिनीसमोरील पार्किंग याप्रमाणे पार्किंग, पिकअप पॉइंट, ड्रॉप पॉइंटची व्यवस्था केली आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

