गुंतवणुकीसाठी दिलेल्या ९३ लाखांचा अपहार

गुंतवणुकीसाठी दिलेल्या ९३ लाखांचा अपहार

Published on

कोरेगाव भीमा, ता. १६ : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोरेगाव भीमा शाखेत एसबीआय लाइफ पॉलिसीमध्ये गुंतवणुकीकरीता तीन जणांनी दिलेली रोख रक्कम व धनादेशाद्वारे दिलेले ९३ लाख ४० हजार रुपये स्वतःसह पत्नी व मैत्रिणीच्या बॅंक खात्यावर भरून घेतली. तसेच पॉलिसीच्या बनावट पावत्या देऊन फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी कोरेगाव भीमा शाखेच्या असिस्टंट एरिया मॅनेजर विकास गुलाब बेलदार (रा. वडमुखवाडी, चऱ्होली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोरेगाव भीमा शाखेत तीन जणांनी एसबीआय लाइफ पॉलिसीमध्ये गुंतवणुकीकरीता रोख व धनादेशाद्वारे ९३ लाख ४० हजार रुपये दिले होते. मात्र, बेलदार याने हे पैसे खातेदाराऐवजी स्वतःसह पत्नी सरला व मैत्रीण तेलंग यांच्या बॅंक खात्यावर भरून घेतले. गुंतवणूकदारांना पॉलिसीच्या बनावट पावत्या देऊन फसवणूक केल्याने शिक्रापूर पोलिसांनी विकास बेलदार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डोंगरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com