डॉ. परदेशी यूएई संघाचे
‘मुख्य फिजिओथेरपिस्ट’

डॉ. परदेशी यूएई संघाचे ‘मुख्य फिजिओथेरपिस्ट’

Published on

कोरेगाव भीमा, ता. २५ : आयसीसीचे सहसदस्य असलेल्या संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाने (यूएई) टी-२० तीन सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. यूएई संघाच्या या पहिल्याच मालिका विजयात मुळचे पुण्याचे असलेले व सध्या दुबई स्थित, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट डॉ. मनिष परदेशी यांनी खेळाडुंची तंदुरुस्ती राखत मोठे योगदान दिले आहे.
आजवर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप्स स्पर्धांमध्ये मुख्य स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉ. परदेशी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन व उपचार केले असून सध्या ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पुरुष टी-२० वर्ल्डकपच्या ‘मुख्य फिजिओथेरपिस्ट या पदावर यूएई क्रिकेट संघाच्या फिटनेसची जबाबदारी सांभाळत आहेत.
सुरुवातीपासूनच क्रीडा क्षेत्राची विशेष आवड असलेल्या डॉ. परदेशी यांनी पुणे येथील मॉडर्न कॉलेजमधून फिजिओथेरपीमधील पदवीचे शिक्षण घेतले तसेच पंजाबमध्ये पदव्युत्तर शिक्षणही घेतले. त्यानंतर स्पोर्ट्स फिजिओथेरपी क्षेत्रात काम करण्यास सुरुवात करीत आपल्या वैशिष्ट्यपुर्ण कामातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट म्हणून नावलौकिक मिळविला आहे.
खेळादरम्यान होणारी स्नायुदुखी वा तत्सम दुखापत ही खेळाडूंच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब असते. मात्र अशा दुखापतींवर डॉ. परदेशी यांनी वेळीच त्यांच्या मदतीला धावून येत अत्यंत कौशल्याने उपचार करुन अशा अनेक खेळाडुंना दिलासा दिला आहे.
डॉ. परदेशी यांनी आजवर भारतीय कब्बड्डी संघासह वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप, जर्मनी येथे झालेल्या डच ओपन वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप, इंडियन बॅडमिंटन असोसिएशन व वर्ल्ड बॅडमिंटन असोसिएशन तसेच डच व जर्मन ओपन बॅडमिंटन कप करीताही हेड स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यभार सांभाळला आहे. कमी कालावधीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढ्या स्पर्धांत खेळाडुंचा फिटनेस सांभाळण्याचा अनुभव असणारे डॉ. परदेशी हे भारतातील एकमेव स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट आहेत. याकरीता भारतासह अनेंक देशांनी त्यांचा सन्मानही केला आहे.
खेळाडूंच्या अनेक दुखापती ऑपरेशनशिवाय बऱ्या केल्या जाऊ शकतात, हे परदेशी यांनी आपल्या वैशिष्ट्यपुर्ण उपचाराद्वारे सिध्द करुन दाखविले आहे. शारीरिक दुखापतीमुळे ऑपरेशनचा सल्ला दिलेल्या अनेक खेळाडुंना योग्य उपचार व योग्य व्यायामाद्वारे ऑपरेशनशिवाय बरे होण्यासाठी व तंदुरुस्तीसाठी परदेशी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.

देशातील क्रिडाक्षेत्राचे यश हे खेळाडुंच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असते. यूएई क्रिकेट संघाच्या मालिकेतही खेळाडुंच्या तंदुरुस्तीवर अधिक लक्ष दिल्याने मालिकेतील विजय साकार झाला. येत्या काळात जगभरातील अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर आधुनिक स्पोर्टस फिजिओथेरपीद्वारे क्रिडा क्षेत्रात खेळाडुंच्या तंदुरुस्तीसाठी करणार असून भारतीय क्रिडाक्षेत्राच्या यशाचा आलेख उंचावण्यासाठीही प्रयत्न करणार आहे.
- डॉ. मनिष परदेशी, हेड स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट, यूएई क्रिकेट संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com