तलावाच्या खोलीकरणाने होणार शेतीसह पर्यटनाचा विकास

तलावाच्या खोलीकरणाने होणार शेतीसह पर्यटनाचा विकास

Published on

कोरेगाव भीमा, ता. ५ : जलविकास व सिंचनाचे स्वप्न साकारण्यासाठी कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील गावकारभारी व ग्रामस्थांची एकजूट, दूरदृष्टी व जिद्दीतून नरेश्वर मंदिरामागील ५३ वर्षे जुन्या तलावाची साठवण क्षमता वाढवण्यासाठी खोलीकरणाच्या कामाचा प्रारंभ केला. यामुळे गावाला शुद्ध पाणीपुरवठा, समृद्ध शेती तसेच पर्यटन विकास असा तिहेरी फायदा होणार आहे.

कोरेगाव भीमा ग्रामपंचायत, सरपंच संदीप ढेरंगे, महाराष्ट्र शासन, टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हे काम होत आहे. कोरेगाव भीमा येथे भीषण पाणीटंचाई निवारणासाठी १९७२ च्या दुष्काळानंतर खोदण्यात आलेला हा तलाव सध्या गळती व गाळाने भरल्याने त्याची साठवण क्षमता घटली होती. त्यामुळे परिसरातील पाणीस्त्रोतांवरही त्याचा विपरीत परिणाम होऊन शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही पुन्हा निर्माण झाला होता. मात्र अत्यंत खर्चिक असे हे काम करायचे कसे? असा प्रश्न होता. अखेर या कामासाठी कोरेगाव भीमा ग्रामपंचायत, सरपंच संदीप ढेरंगे, महाराष्ट्र शासन, टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशन यांनी सामूहिकपणे पुढाकार घेतला. नाम फाउंडेशनचे समन्वयक निवृत्त सनदी अधिकारी इंद्रftत देशमुख यांनीही मोलाचे योगदान देत हा योग जुळवून आणला. तर वन विभागाचे अमोल सातपुते, निळकंठ गव्हाणे, गौरी हिंगणे आणि सोपान अनसुने यांचेही मोठे सहकार्य लाभले आहे.

या शुभारंभ प्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य पी. के. गव्हाणे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कैलासराव सोनवणे, अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे, माजी अध्यक्ष पंडित ढेरंगे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, अशोक काशीद, डिंग्रजवाडीचे सरपंच प्रकाश गव्हाणे, वाडा पुनर्वसनाच्या सरपंच योगिता ढोरे, पोलिस पाटील नितीन ढोरे, वसंत गिलबिले, माजी उपसरपंच बाळासाहेब वाडेकर, ग्रामपंचायत सदस्य महेश ढेरंगे, शरद ढेरंगे, वंदना गव्हाणे, जयश्री गव्हाणे, शंकर गव्हाणे, कांताराम कडलक, पोपट ढेरंगे, राजाराम नळकांडे, नामदेव शिवले, शेखर गव्हाणे, संतोष बगाटे, सागर कापसे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


तलावाच्या खोदकामात पूर्वजांनी घाम गाळत पुढे शेती पिकवली. आमची पिढी जगवली व आता पुन्हा खोलीकरणातून हा तलाव गावाला शुद्ध पिण्याचे पाणी, समृद्ध शेती व पर्यटन विकास वाढवणार आहे. तत्कालीन दुष्काळी परिस्थितीचे स्मृतिस्थळ असलेला हा तलाव आता गावच्या नव्या विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
- पी. के. गव्हाणे, सदस्य, माजी पंचायत समिती


05005

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com