विकसित महाराष्ट्रासाठी योगदान देणारे अभ्यासू, सुसंस्कृत मुख्यमंत्री

विकसित महाराष्ट्रासाठी योगदान देणारे अभ्यासू, सुसंस्कृत मुख्यमंत्री

Published on

राजकारण हे सामाजिक व आर्थिक बदल घडवून आणण्याचे एक प्रभावी साधन आहे, असे मानत याच आदर्श हेतूने राजकीय वाटचाल करणारे तसेच विद्वता, लोकप्रियता आणि कष्टाळूपणा या सद्गुणांचा सुंदर मिलाफ असणारे एक दुर्मिळ व्यक्तिमत्त्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब...
- प्रदीप कंद, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, पुणे (उत्तर)
संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे.

नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी व डी.एस.ई.बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण घेतलेले मा. देवेंद्रजी, हे एक उच्चशिक्षित, सुसंस्कृत व सतत राज्यातील जनतेच्या हिताचा विचार करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला लाभले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र अत्यंत वेगाने प्रगतीपथावर धावत आहे.

स्वच्छ प्रतिमा व कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून ख्याती असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला विनम्र व सुसंस्कृत स्वभाव सत्तेवर नसताना व असतानाही कायम जपला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदी कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका व जिल्हा पिंजून काढत भाजपचे विचार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवत राज्यभर संघटनही वाढवले.
मुख्यमंत्रीपदावर असूनही राज्यातील कार्यकर्त्यांच्या मेसेजला प्रतिसाद देत वेळप्रसंगी त्याचे कौतुकही करतात. सकाळीच कार्यालयात हजर होत न थकता प्रसंगी दिवसातील १४ ते १६ तास काम करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे भाग्य म्हणावे लागेल. त्यांची हीच वैशिष्ट्यपूर्ण कामाची पद्धत आमच्या सारख्या पदाधिकाऱ्यांनाही काम करताना प्रेरणादायी ठरते. तसेच बारकाईने अभ्यास करण्याचा स्वभाव असल्याने कोणताही प्रश्न वा मुद्दा त्यांच्या समोर मांडल्यास त्यावर त्यांचे बिनचूक व समर्पक उत्तर तयार असते.
सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा नागपूरचे महापौर म्हणून निवडून येणारे सर्वात तरुण महापौर आणि वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री असून विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाफ साधणारे एक दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत.
विशेष गुणवत्तेसह कायद्याची पदवी मिळविल्यामुळे त्यांच्याकडे कायद्याची उत्तम समजही आहे व ते ज्ञान समाजात बदल घडविण्यासाठी वापरण्याची त्यांची क्षमताही आहे. या क्षमतेचा धोरणे ठरविताना व राबविताना त्यांना खूप उपयोग होतो. संख्या शास्त्र व आकडेवारीचीही योग्य समज असल्यामुळे ते कोणत्याही घटनेत भक्कम कायदेशीर, आर्थिक, तांत्रिक व मुख्य म्हणजे लोकहिताच्या दृष्टिकोनातून काम करु शकतात. हे कार्य करत असताना जनतेची गाऱ्हाणीही आस्थेवाईकपणे ऐकून घेत असल्यामुळे सामान्य माणसाच्या वेदना आणि चिंताही त्यांना समजतात व त्याचे निराकरणही केले जाते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचेही नेहमीच कौतुक करीत असतात. मोदीजी यांच्या आदर्श कार्याचा वारसा चालविणारे देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी व महाराष्ट्रातील जनतेसाठी अनेक धाडसी निर्णय घेत ते अमलात आणले.
‘विकसित भारत २०४७’ या राष्ट्रीय मोहिमेचा भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनही ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी स्वतःचा आराखडा तयार करत आहे. या उपक्रमाअंतर्गत ‘एक भविष्यकालीन प्रगत महाराष्ट्र’ घडवण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्देश आहे. ज्यामध्ये कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता, यावर विविध घटकांच्या सहयोगातून विशेष भर दिला जात आहे. येत्याकाळात मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हे देशात प्रथम क्रमांकाचे विकसित राज्य होईल, असा विश्वासही सर्वसामान्य जनतेला वाटतोय.
जनतेच्या मनातील विकसित व प्रगत महाराष्ट्र राज्याचे स्वप्न साकारण्यासाठी अहोरात्र झटणारे सुसंस्कृत मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

05033, 05034

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com