वढू बुद्रुक येथून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

वढू बुद्रुक येथून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

Published on

कोरेगाव भीमा, ता. १० : मराठवाड्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून पुण्यातील साई ॲकॅडमी, धर्मवीर ट्रेकर्स ग्रुप आणि वढू बुद्रुक (ता. शिरूर) ग्रामस्थांच्या वतीने आढाळा (जि. उस्मानाबाद) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांच्या मातांनाही साड्या देण्यात आल्या.
या उपक्रमात साई ॲकॅडमीचे संचालक संदीप आरगडे व त्यांच्या उद्योग क्षेत्रातील मित्रपरिवाराने सहभाग घेतला. याप्रसंगी ग्रामस्थ, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी या कार्याचे कौतुक करताना ॲकॅडमी आणि धर्मवीर ट्रेकर्स ग्रुप यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी शिक्षण आणि माणुसकीचा सुंदर संगम असल्याचे सांगत संदीप आरगडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभारही मानले.

05155

Marathi News Esakal
www.esakal.com