अहिल्यानगर मार्गावर विमाननगर पॅटर्न राबवा

अहिल्यानगर मार्गावर विमाननगर पॅटर्न राबवा

Published on

कोरेगाव भीमा, ता. २४ : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर पेरणे फाटा ते लोणीकंद दरम्यान सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने या ठीकाणी विमाननगर पॅटर्न प्रमाणे चौक बंद करून दोन्ही दिशेने प्रभावी वाहतूक नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाढत्या नागरिकरणामुळे सध्या पुणे-अहिल्यानगर महामार्गावर रोजच दोन्ही बाजूंनी खुप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भीमा, पेरणेफाटा, तुळापूर फाटा, लोणीकंद, वाघोली येथे खुप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. रोजच सायंकाळच्या वेळी होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे या परिसरात मोटारी समवेत दुचाकीस्वारांनाही वाहन चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळे पेरणे फाटा तसेच लोणीकंद हद्दीत विमाननगर प्रमाणे मुख्य चौक बंद करून प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या वाहतूक कोंडीत रोज अनेक रुग्णवाहिकाही अडकत असल्याने रुग्णांची गैरसोय होत असून उद्योजक, कंपनी कामगार, तसेच लांब पल्ल्याच्या प्रवाशांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. पुण्याहून अहिल्यानगरकडे जायचे असेल किंवा अहिल्यानगरकडून पुण्याला जायचे असेल तरी या परिसरात वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. याचा गेले काही दिवस प्रवासी अनुभव घेत आहेत.


नागरिकांनी सुचविलेले प्रकार
पेरणे फाटा चौक प्रायोगिक तत्त्वावर सायंकाळच्या वेळी बंद करून वाहतूक दोन्ही बाजूने विजयस्तंभ व टोल नाका येथून यु-टर्न मारून वळवणे
पेरणे व लोणीकंद येथे चौकात सिग्नल लावावेत तसेच वाहतूक पोलिस, कर्मचारी जागेवर कार्यरत असावेत.
मुख्य चौकात उभ्या असणाऱ्या रिक्षा तसेच जवळपास हमरस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी असणारी वाहने हटवणे
लेन शिस्तीसह वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या व प्राधान्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कठोर कारवाई करावी

5223

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com