दागिन्यांची मागणी केल्याने
वाडेबोल्हाईत पत्नीचा खून

दागिन्यांची मागणी केल्याने वाडेबोल्हाईत पत्नीचा खून

Published on

केसनंद, ता. २३ : सोन्याच्या दागिन्यांची वारंवार मागणी करत असल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीचा चाकूने वार करून खून केल्याची घटना वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथे गुरुवारी (ता. २३) रात्री घडली. नम्रता शैलेंद्र व्हटकर (रा. बकोरी, ता. हवेली), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून पती शैलेंद्र प्रकाश व्हटकर यास ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेला लोखंडी चाकुही जप्त केला आहे.
याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडेबोल्हाई येथे राहणारे आरोपी शैलेंद्र प्रकाश व्हटकर व मयत नम्रता हे पती-पत्नी आहेत. नम्रता ही गहाण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची मागणी वारंवार पतीकडे करत होती. याचा राग मनात धरुन आरोपी शैलेंद्र याने त्याची पत्नी नम्रता हीस गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बोलावून घेऊन त्याच्याकडील चाकूने नम्रताचे गळ्यावर, चेहऱ्यावर वार करून गंभीर जखमी करून तीचा खून केला.
या प्रकरणी शाहरुख दस्तगीर पठाण (वय २३, रा. शिरसवडी, वाडेबोल्हाई, ता. हवेली; मुळ रा. गुनाट, ता. शिरुर) यांच्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com