हवेली तालुक्यात शनिवारपासून समाधान शिबिर
केसनंद, ता. ४ : राज्यशासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक एकच्या अनुषंगाने नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) अप्पर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील मंडल निहाय चार ठिकाणी समाधान शिबिरांचे आयोजन येत्या शनिवारपासून (ता. ७) करण्यात येणार आहे.
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी वाघोली, अष्टापूर, उरुळी कांचन व
थेऊर या मंडल कार्यालयाअंतर्गत चार शिबिरांचे आयोजन केले आहे.
या शिबिरांच्या वेळापत्रकानुसार पहिले शिबिर येत्या शनिवारी (ता. ७) वाघोली मंडल कार्यालयाअंतर्गत केसनंद येथे महादेव मंदिराशेजारी, तर शनिवारी (ता. १४) अष्टापूर मंडल कार्यालयाअंतर्गत अष्टापूर येथे ग्रामपंचायत सभागृह, १० एप्रिल रोजी उरुळी कांचन मंडल कार्यालयाअंतर्गत सोरतापवाडी, तर शेवटचे शिबिर १७ एप्रिल रोजी थेऊर मंडल कार्यालयाअंतर्गत कोलवडी येथे होईल.
या शिबिरांमध्ये प्रशासनाकडून विविध महसुली सेवा व शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच, या अभियानामुळे महसूल प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत होऊन प्रलंबित प्रश्नांना गती मिळणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयाच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

