

कोरेगाव भीमा, ता. २६ : पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत भीमा नदीकिनारी विकसित करण्यात आलेल्या नव्या बाजारमैदानामुळे कोरेगाव भीमा (ता. हवेली) येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला आहे. मात्र, मोबाईल चोरी व पाकीटमारीच्या वाढत्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच, बाजारामध्ये विविध सुविधांचा अभाव जाणवत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
कोंडीवर अंशतः दिलासा
पूर्वी बाजार मुख्य रस्त्यावर भरत असल्याने दर गुरुवारी मोठी वाहतूक कोंडी
विक्रेत्यांमुळे पादचाऱ्यांना त्रास
नव्या कॉंक्रिट बाजारमैदानामुळे परिस्थितीत सुधारणा
तरीही वढू चौक परिसरात गर्दीमुळे अंशतः कोंडी कायम
पायाभूत सुविधांची कमतरता
चिखलमुक्त मैदानामुळे व्यापाऱ्यांना दिलासा
प्रकाशयोजना उपलब्ध
मात्र, ओटे, शेड, पार्किंग, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे अपुरी
पार्किंगचा मोठा प्रश्न
स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नाही
वाहने मोकळ्या जागेत उभी
मोठ्या वाहनांमुळे कोंडी वाढते
स्वच्छतेत सुधारणा; तरी अपेक्षा कायम
बाजारानंतर दुसऱ्या दिवशी कचरा उचलला जातो
महिला- पुरुषांसाठी शौचालये उपलब्ध
स्वच्छतेच्या दर्जाबाबत नागरिक असमाधानी
पिण्याच्या पाण्याची गैरसोय
शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही
व्यापाऱ्यांना जार खरेदी करावे लागतात
नागरिक बाटलीबंद पाण्यावर अवलंबून
शुल्क व पारदर्शकतेवर प्रश्न
बाजार शुल्क वसुलीत पारदर्शकतेचा अभाव
पावतीशिवाय पैसे घेतल्याच्या तक्रारी
वजन-माप तपासणी नियमित नाही
प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी नाही
प्रतिबंधित प्लॅस्टिकचा सर्रास वापर
प्रशासनाकडून कारवाईचा अभाव
सुरक्षा चिंतेचा विषय
महिला सुरक्षेबाबत मोठ्या तक्रारी नाहीत
मोबाईल चोरी व पाकीटमारीच्या घटना वाढल्या
वर्षभरात ८ तक्रारींची नोंद; कारवाईबाबत नाराजी
05542
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.