
केडगाव येथील शिबिरात ३३१ जणांकडून रक्तदान
केडगाव, ता. १४ ः केडगाव (ता. दौंड) येथे १७ संस्थांनी मिळून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३३१ जणांनी रक्तदान केले. ''आम्ही केडगावकर व बोरीपार्धीकर'' यांनी हे शिबिर आयोजित केले होते.
शिबिरास माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, जैन साध्वी शुभदाजी, राहुल महाराज राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, धनाजी शेळके, राणी शेळके, झुंबर गायकवाड, नितीन दोरगे, दिलीप हंडाळ, बोरीपार्धीचे सरपंच सुनील सोडनवर, अभिषेक थोरात, शेखर सोडनवर, नितीन कुतवळ, मनोज शेळके आदी उपस्थित होते. डॉ सचिन भांडवलकर, डॉ श्रीवल्लभ अवचट, डॉ सागर कदम, डॉ किशोर कांबळे, डॉ ज्ञानदेव शेळके यांचे शिबिराला सहकार्य मिळाले. शिबिरात केडगाव व बोरीपार्धीतील १७ सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी सहभाग घेतला.
संयोजक म्हणून नितीन जगताप, डॉ. संदीप देशमुख, धनराज मासाळ, नीलेश मेमाणे, प्रीतम गांधी, गजानन लोणकर, सलमान खान, हर्षद शिकिलकर, आशिष नाहटा, समीर डफेदार, वसीम बेग, तुषार शेळके, अविनाश खुंटे, नीलेश कुंभार, आकाश चव्हाण यांनी काम पाहिले.