केडगाव केंद्रात सरस्वती पूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडगाव केंद्रात सरस्वती पूजन
केडगाव केंद्रात सरस्वती पूजन

केडगाव केंद्रात सरस्वती पूजन

sakal_logo
By

केडगाव, ता. २३ ः सकाळ बाल मित्र चित्रकला स्पर्धेत केडगाव केंद्रात २७५ विद्यार्थी रंग रेषांच्या दुनियेत हरवून गेले. विद्यार्थ्यांना आपल्या चित्रासमवेत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.
जवाहरलाल विद्यालयाचे प्राचार्य बिभीषण म्हस्के यांनी सरस्वती पूजन करून चित्रकला स्पर्धेचे उद्‍घाटन केले. खुल्या गटात मीनाज शेख व शेखर थरकार यांनी भाग घेतला. स्पर्धेला केडगाव, बोरीपार्धी, गलांडवाडी, चौफुला, आंबेगाव, दापोडी येथून विद्यार्थी आले होते. यावेळी जवाहरलाल इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य मॅारिस अँड्रॅाड, पर्यवेक्षक मुकुंद भिसे, कलाशिक्षक गजानन लोणकर, शिक्षक सुरेश सूर्यवंशी, विद्या सोडनवर, शरद बिटके यांनी स्पर्धेचे नियोजन केले. सकाळचे बातमीदार रमेश वत्रे यांनी आभार मानले.