पत्नीच्या मारहाणीतील 
जखमी पतीचा मृत्यू

पत्नीच्या मारहाणीतील जखमी पतीचा मृत्यू

केडगाव, ता. ३१ : दारू पिऊन खूप त्रास देतो म्हणून पत्नीने लाकडाने मारहाण केल्याने जखमी झालेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष आबा पवार (वय ३९), याचा या मारहाणीत मृत्यू झाला. चौफुल्यातील नवीनगावात ही घटना घडली आहे.
संतोष पवार हा सतत दारू पिऊन पत्नी पल्लवी हिचा छळ करीत होता. हा त्रास अनावर झाल्याने तीने त्याला २२ जुलैला रात्री घरात लाकडाने डोक्यावर, हातावर मारहाण करत जखमी केले होते. मारहाणीनंतर रविवारी पहाटे संतोष याला चक्करचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रूग्णालयात दाखल केले होते. तेथे त्याचा रविवारी (ता. ३०) उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत संतोष याचा चुलतभाऊ सचिन पवार (रा. वरवंड, ता. दौंड) यांनी पल्लवी हिच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे पुढील तपास करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com