केडगावात शेतकऱ्याची पैशाची पिशवी पळवली

केडगावात शेतकऱ्याची 
पैशाची पिशवी पळवली
Published on

केडगाव, ता. २७ : केडगाव (ता. दौंड) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडून घेतलेल्या पीक कर्जाचा हप्ता भरण्यासाठी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी ज्येष्ठ शेतकऱ्याकडील पैशांची पिशवी हिसकावून पोबारा केला. केडगाव बाजारपेठेत भर दुपारी ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शिवाजी गायकवाड (वय ६१, रा. केडगाव) यांच्या हातातील पैशाची पिशवी चोरट्यांनी पळवली आहे. गायकवाड यांनी केडगाव येथील बँक ऑफ इंडियामधून एक लाख पंधरा हजार रुपये पीक कर्ज भरण्यासाठी काढले होते. दुपारी चार वाजता ते केडगाव सोसायटीकडे भरणा करण्यासाठी पायी जात असताना बाजारपेठेतच चोरट्याने त्यांच्या पैशावर डल्ला मारला. गायकवाड यांनी एक लाख दहा हजार रुपये पिशवीत ठेवले होते, तर पाच हजार रुपये खिशात ठेवले होते. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांपैकी एकाने हेल्मेट घातले होते, तर दुसऱ्या चोरट्याने तोंडाला रुमाल बांधला होता. पैशाची पिशवी हिसकावल्यानंतर गायकवाड दुचाकी मागे ओरडत पळाले, पण त्याचा उपयोग झाला नाही. घटनेनंतर चोरटे सुसाट पळून गेले. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक संपांगे म्हणाले, ‘‘पेठेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. चोरटे लवकरच सापडतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com