चौफुल्यात शनिवारी साहित्य संमेलन

चौफुल्यात शनिवारी साहित्य संमेलन
Published on

केडगाव, ता. ११ : चौफुला (ता. दौंड) येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान आयोजित चौथे साहित्य संमेलन शनिवार ( ता. १४ ) व रविवारी (ता. १५) होत आहे. संमेलनाध्यक्षपदी प्रसिद्ध कवी म. भा. चव्हाण यांची निवड केली आहे. संमेलनाचे उद्‍घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संमेलनाचे मुख्य प्रवर्तक दशरथ यादव यांनी दिली. दुपारी १२ वाजता संमेलनाच्या उद्‍घाटनानंतर ग्रंथदिंडी, जलाभिषेक, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन व समारोप असे कार्यक्रम होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com