मलठणच्या शेतकऱ्यांकडून २९ ट्रॅक्टरची खरेदी
केडगाव, ता. १३ : मलठण (ता.दौंड) येथील शेतकऱ्यांनी २९ ट्रॅक्टरची खरेदी केली आहे. हे सर्व ट्रॅक्टर ऊस वाहतुकीसाठी वापरले जाणार आहेत. एका छोट्या गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर विकले जाणे हे प्रगतीचे लक्षण आहे.
दौंड ऊस लागवडीखालील क्षेत्र गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेली दोन हंगाम बंद असलेला यवत येथील अनुराज साखर कारखाना यंदा चालू होत आहे. भीमा पाटस व दौंड शुगर कारखान्याने आपल्या गाळप क्षमता वाढवल्या आहेत. त्यामुळे यंदा ऊस गाळपाचा हंगाम चांगला राहण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे शेतकऱ्यांना ऊस वाहतूकमधून चांगले पैसे कमविण्याची संधी आहे. दौंड तालुक्यात ७५ हजार एकर क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, ओबीसी महामंडळ यांच्याकडून गेल्या दोन वर्षात अनुदानित ट्रॅक्टर मिळाले नव्हते. यंदा अनुशेष भरून काढण्यास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे यंदा ट्रॅक्टर खरेदीत शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
तालुका कृषी अधिकारी अजिंक्य दुधाणे म्हणाले, यंदा अनुदानित ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात मंजूर झाले आहेत. त्यामुळे नवीन ट्रॅक्टर घेऊन व्यवसाय करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सरकारच्या कृषी यांत्रिकीकरणातील विविध योजनांमधून लाभार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
गावातील शेतकरी दौंड, बारामती, फलटण येथे ऊस वाहतुकीसाठी जात असतात. गावातून १२० ट्रॅक्टर मालक ऊस वाहतुकीचा व्यवसाय करतात. प्रत्येक ट्रॅक्टरमागे शेतकऱ्यांना खर्च वजा जाता सुमारे चार ते पाच लाख रुपयांची कमाई होते.
- दत्तात्रेय कदम, मलठण
04019
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.