कुल- थोरात यांच्या राजकीय भवितव्याची लढाई

कुल- थोरात यांच्या राजकीय भवितव्याची लढाई

Published on

कुल- थोरात यांच्या राजकीय भवितव्याची लढाई

दौंड पंचायत समितीवर मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार रमेश थोरात यांचे वर्चस्व होते. दरम्यान आमदार राहुल कुल यांनी बाजार समितीवर वर्चस्व मिळवले. आता पंचायत समितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांची मोर्चेबांधणी चालू आहे. मात्र, रमेश थोरात हे विधानसभा व बाजार समितीमधील अपयश धुवून काढण्यासाठी जंग जंग पछाडणार आहेत.

- रमेश वत्रे, केडगाव

दौंड पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. हे आरक्षण खामगाव, यवत, राहू या गणातून निघाले आहे. त्यामुळे या गणातील विजयी उमेदवार सभापती होणार, हे आता निश्चित झाले आहे. परिणामी या गणात सर्व राजकीय पक्ष आपली पूर्ण ताकद पणाला लावणार, हे ठरलेले आहे. सभापतिपद आरक्षित झाल्याने सर्वसाधारण गटात असणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. आता हे कार्यकर्ते उपसभापतिपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत.
दौंड पंचायत समितीच्या गेल्या कार्यकाळात बोरीपार्धी (मीना धायगुडे), केडगाव (झुंबर गायकवाड), पाटस (आशा शितोळे), कानगाव (हेमलता फडके), मलठण (ताराबाई देवकाते) या गावांना सभापतिपदाचा मान मिळाला आहे. यंदा यवत, खामगाव, राहू गणातील विजयी उमेदवारांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार, हे निश्चित आहे. या गणातील इतर मागास प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या व नेतेमंडळींच्या गाठीभेटी घ्यायला सुरवात केली आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार रमेश थोरात यांचे पंचायत समितीवर वर्चस्व होते. दरम्यान आमदार राहुल कुल यांनी बाजार समिती वर्चस्व मिळवले. पंचायत समितीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राहुल कुल यांची मोर्चेबांधणी चालू आहे. तर, रमेश थोरात हे विधानसभा व बाजार समितीमधील अपयश धुवून काढण्यासाठी जंग जंग पछाडतील.
पुढील वर्षात पंचायत समिती, दौंड नगरपरिषद, भीमा पाटस साखर कारखाना या महत्त्वाचा निवडणुका येऊ घातल्या आहेत. एका निवडणुकीवर दुसऱ्या निवडणुकीचे यश अवलंबून आहे. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष निवडणुकीत जोखीम घ्यायला तयार नाही.
दौंड पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत होईल. कारण, या दोन्ही पक्षांची तालुक्यातील विविध संस्थांवर सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षसुद्धा या निवडणुकीत आपले नशीब आजमावेल. शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुक्यातील प्राबल्य आव्हानात्मक नाही. भाजप व राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळालेले कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवतील, अशी शक्यता आहे.
सध्या दौंड विधानसभा, भीमा पाटस साखर कारखाना, दौंड बाजार समिती, नगरपरिषद यावर आमदार आमदार राहुल कुल यांचे वर्चस्व आहे. तर, दौंड खरेदी विक्री संघ, दूध संघ यावर माजी आमदार रमेश थोरात यांचे वर्चस्व आहे. कुल-थोरात हे त्यांच्या वैयक्तिक राजकीय भवितव्यासाठी या निवडणुकीत जिवाचे रान करतील.

मागील पंचायत समितीतील बलाबल
राष्ट्रवादी काँग्रेस- ११
राष्ट्रीय समाज पक्ष- १

तालुक्यातील समस्या
- अनेक गावांत कचरा व्यवस्थापन नाही.
- मुलांना खेळायला क्रीडांगण नाही.
- अनेक वाड्या वस्त्यांना पिण्याचे पाणी नाही.
- पथदिव्यांपासून वाड्यावस्त्या वंचित
- शिष्यवृत्ती परीक्षेतील निचांक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com