चौफुला येथे टपरीत बंटा गोळीची विक्री
केडगाव, ता. २ : पुणे सोलापूर महामार्गालगत चौफुला (ता. दौंड) येथे एका पानटपरीमध्ये अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली. रमेश रामबली कुसवाह (वय ४० रा. उत्तर प्रदेश), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसवाह हा अमली पदार्थयुक्त असलेल्या बंटा गोळीची विक्री करत होता. पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली तेव्हा पानटपरीतून आठ पाकीटे जप्त करण्यात आली आहे. या पाकिटांचे वजन दोन किलो १६९ ग्रॅम भरले आहे. या पाकिटांवर ‘आनंद मनुक्का’ नाव लिहिले आहे. गुंगीकारक पदार्थ व गांजामिश्रीत या बंटा गोळ्या आहेत. फॅारेन्सिक तपासणीत या गोळ्यांमध्ये अमली पदार्थ असल्याची पोलिसांची खात्री झाली आहे. आरोपीने बेकायदेशीरपणे अमली पदार्थांची साठवणूक व विक्री केल्याबद्दल त्याच्या विरूद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. यवत पोलिस पुढील तपास करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

