चौफुला येथे आकर्षक सजावट
केडगाव, ता. २१ : ‘‘रयतेचे राज्य उभे करत असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मरक्षक संभाजी महाराज यांनी कधीही सुखाचा विचार केला नाही,’’ असे मत शिवव्याख्याते अक्षय चंदेल यांनी व्यक्त केले.
श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने चौफुला (ता. दौंड) येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी चंदेल बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘‘आपल्या येथे साडेतीन शक्तिपीठ आहेत. मात्र, चौथे शक्तिपीठ हे जिजामाता आहेत. त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना घडविले. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी अहोरात्र कष्ट करून रयतेचे राज्य उभारले. या रयतेच्या राज्यासाठी महाराष्ट्रातील १८ पगड जातीतील मावळ्यांनी आपले बलिदान का दिले? याचा आपण अभ्यास केला पाहिजे. शिवजयंतीनिमित्त आपण छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांना शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’’
यावेळी शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. जयंतीनिमित्त पुतळ्यांच्या भोवती फुलांची आरास व विद्युत रोषणाई केली होती. ग्रामस्थांनी या प्रतिमांचे दिवसभरात दर्शन घेतले. चंदेल यांनी शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा जीवनपट यावेळी उलगडून दाखविला.
04221
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

