मोहन टुले यांची अध्यक्षपदी निवड

मोहन टुले यांची अध्यक्षपदी निवड

Published on

केडगाव, ता. २३ : येथील दौंड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी मोहन रामचंद्र टुले ( एकेरीवाडी) यांची तर उपाध्यक्षपदी नंदा दत्तात्रेय ताकवणे (पारगाव) यांची बिनविरोध निवड करण्यात आली, अशी माहिती संघाचे व्यवस्थापक सुहास रुपनवर यांनी दिली.
दोन्ही पदांसाठी टुले व ताकवणे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. संघाचे शिवाजी ढमाले यांनी अध्यक्षपदाचा आणि स्वाती कोळपे यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर टुले व ताकवणे यांच्या निवडी करण्यात आल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साहाय्यक निबंधक डी.एच.मिसाळ यांनी काम पाहिले. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, पोपटभाई ताकवणे, नानासाहेब जेधे, विश्वास भोसले, भिवाजी गरदडे, विजय नागवडे, दिलीप हंडाळ, शिवाजी ढमाले, धनंजय शेळके आदी उपस्थित होते.
....04225, 04226

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com