‘द ग्रेट वॅारिअर्स’ने पटकाविला शिवशंभू चषक

‘द ग्रेट वॅारिअर्स’ने पटकाविला शिवशंभू चषक

Published on

केडगाव, ता. २४ ः आंबेगाव पुनर्वसन येथील विकास मित्र मंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा शिवशंभू चषक केडगाव (ता. दौंड) येथील द ग्रेट वॉरिअर्स संघाने पटकाविला. स्पर्धेत २४ संघानी भाग घेतला. रोहन गरदडे हा खेळाडू मॅन ऑफ सिरीज ठरला.
द ग्रेट वॅारिअर्सचे संघाचे मालक दत्ता कडू व कर्णधार अमर शेळके यांनी शिवशंभू चषक स्वीकारला. माजी आमदार रमेश थोरात यांनी स्पर्धेचे उद्‍घाटन केले, तर जिल्हा परिषदेचे सदस्य तुषार थोरात व भीमा पाटस कारखान्याचे संचालक धनाजी शेळके यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पाडले. स्पर्धा काळात पंचायत समितीचे सदस्य धनंजय शेळके, अशोक शेळके, बापूराव गायकवाड, राजेंद्र मलभारे, दिलीप हंडाळ, राहुल हंडाळ, मनोज शेळके, सचिन शेळके, आशिष शेळके, शिवाजी शेळके, सलमान खान, औदुंबर शेळके, प्रीतम देशमुख, सागर मसुडगे यांनी उपस्थिती लावली. विकास मित्र मंडळाचे सार्थक धुमाळ, आदित्य कडू, प्रसाद कडू यांनी स्पर्धेचे संयोजन केले. ऋषी पवार यांनी समालोचन केले.

विजेत्या द ग्रेट वॉरिअर्स संघातील अन्य खेळाडू याप्रमाणे- रेवण गोरगल, रोहन गरदडे, गणेश पवार, संकेत शिंदे, महेश हरिहर, सुहास मासाळ, विलास जगताप, विजय हाडके, सार्थक धुमाळ, संदीप गोरगल.

स्पर्धेचा निकाल - प्रथम- द ग्रेट वॉरिअर्स केडगाव, द्वितीय- गोपीनाथ क्रिकेट क्लब वरवंड, तृतीय- ११ कोरेगाव मूळ, उत्तेजनार्थ- व्हिक्टरी स्पोर्ट, बोरीपार्धी.

04228

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com