जेधे हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन
केडगाव, ता. ३ : बोरीपार्धी (ता. दौंड) येथील समाजसेवक शिवाजीराव जेधे विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या प्रदर्शनामध्ये नर्सरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध वैज्ञानिक प्रकल्प सादर केले.
विद्यार्थ्यांनी विज्ञानाशी संबंधित विविध कल्पक मॉडेल्स आणि प्रकल्प सादर करून उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ग्रामीण व शहरी जीवनाचा तुलनात्मक अभ्यास, पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत, विज्ञानातील नवीन प्रयोग आदी विषयांवर आधारित प्रकल्प विशेष आकर्षण ठरले.
या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत झाली. पालक व नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे कौतुक केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे प्रकल्प तयार केले होते. मुख्याध्यापिका देवयानी तापकीर व पर्यवेक्षिका नीता टेंगले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

