दुबईत अडकलेले दौंडकर सुखरूप परतले

दुबईत अडकलेले दौंडकर सुखरूप परतले

Published on

केडगाव, ता. ६ ः दुबईत अडकलेले दौंड तालुक्यातील सात जण नुकतेच मायदेशात सुखरूप परतले. त्यांच्या आगमनामुळे कुटुंबीयांच्या जीव भांड्यात पडला आहे.
दौंड तालुक्यातील सात विमा प्रतिनिधी दुबई येथे एका आंतरराष्ट्रीय समारंभासाठी गेले होते. मात्र आखाती देशांमध्ये युद्ध चालू झाल्याने त्यांचे सोमवारचे (ता. २) परतीचे विमान रद्द झाले. त्यामुळे दौंडकरांसह अनेक भारतीय दुबईत अडकून पडले. तेव्हापासून त्यांच्या परतीसाठी विविध पातळीवर प्रयत्न चालू होते. दौंडकर दुबईत सुखरूप असले तरी टीव्हीवरील बातम्यांमुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते.
दौंड तालुक्यातील धनंजय काळे, अनिकेत ताकवणे (रा. पारगाव ) पिता-पुत्र गणेश बारवकर व श्रेयश बारवकर (रा. केडगाव ), राजाराम काकडे (रा. बोरीभडक), विजय थोरात व त्यांच्या पत्नी अमृता थोरात (रा. वाळकी), सूर्यकांत हगारे (रा. भिगवण ता. इंदापूर) यांचा या प्रतिनिधींमध्ये समावेश आहे. या प्रवाशांच्या सुटकेसाठी कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे व आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रयत्न केले होते. हैद्राबाद येथे विमानातून उतरल्यानंतर तेथून बसने ८४ विमा प्रतिनिधी रात्री उशिरा पुण्यात पोहचले.

नशीब बलवत्तर म्हणून मायदेशी परतलो
आम्ही शारजा विमानतळावर पोहचलो. आमची तपासणी होऊन विमानात बसलो. त्याच वेळी आमच्या नंतरच्या विमान प्रवाशांचे चेकिंग होत आले होते. आमच्या विमानाने भारतीय वेळेनुसार मध्यरात्री बारा वाजता उड्डाण केले. आणि थोड्याच वेळात शारजा विमानतळापासून थोड्या अंतरावर ड्रोन हल्ला झाला. त्यामुळे आमच्यानंतरचे विमान रद्द करण्यात आले. चेकिंग झालेल्या ५६ विमा प्रतिनिधींना पुन्हा हॅाटेलवर नेण्यात आले. आज पहाटे साडेतीन वाजता आमचे विमान हैद्राबाद विमानतळावर उतरल्यानंतर आम्ही सुटकेचा श्वास सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com