केडगावात मुलींना एचपीव्ही लसीकरण

केडगावात मुलींना 
एचपीव्ही लसीकरण
Published on

केडगाव, ता. ११ ः केडगाव (ता. दौंड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य तुषार थोरात यांनी या मोहिमेचे उद्‍घाटन केले. यावेळी पंचायत समिती सदस्य धनंजय शेळके, केडगावच्या सरपंच पुनम बारवकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलीमा लोखंडे, स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा जाधव उपस्थित होते. डॉ. नीलिमा लोखंडे यांनी या लसीबद्दल मार्गदर्शन केले व सोशल मीडिया वर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या १४ वर्षावरील व १५ वर्षांखालील मुलींना ही लस देण्यास पालकांना आवाहन केले. यावेळी लस संदर्भात काहीही शंका असल्यास आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना भेटून शंकानिरसन करण्यास विनंती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com