दौंड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हितेंद्र गद्रे

दौंड पत्रकार संघाच्या 
अध्यक्षपदी हितेंद्र गद्रे
Published on

केडगाव, ता. १३ : दौंड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हितेंद्र गद्रे (सकाळ) यांची, तर सचिवपदी बापू नवले (लोकमत) यांची बिनविरोध निवड झाली.
चौफुला येथे संघाच्या बैठकीत या निवडी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रवी पाटील व सुनील भांडवलकर यांनी पाहिले. अध्यक्षपदासाठीचे उमेदवार संतोष काळे, राजेंद्र खोमणे, जीवन शेंडकर यांनी माघार घेतल्याने गद्रे यांची बिनविरोध निवड झाली.
अन्य निवडी पुढीलप्रमाणे- अमर परदेशी व मनोज खंडाळे (उपाध्यक्ष), संदीप जाधव (कार्याध्यक्ष), गणेश आनंदा सुळ (सहसचिव), मंगेश पायगुडे ( खजिनदार), सतीश गुंदेचा (निमंत्रक), राजू जगदाळे (सल्लागार), रवींद्र खोरकर (जिल्हा प्रतिनिधी), दीपक देशमुख (पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती). सदस्य म्हणून जीवन शेंडकर, एम. जी. शेलार, त्रिभुज शेळके, गणेश चोपडे आणि गणेश बाजीराव सुळ यांची निवड झाली.
प्रकाश शेलार यांनी सूत्रसंचालन केले. रमेश वत्रे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com