
सुनील वाघमोडेने पटकाविले थाळीफेकमध्ये सुवर्णपदक सुनील वाघमोडे पटकविले थाळीफेकमध्ये सुवर्णपदक
निमगाव केतकी, ता.१२ : शेळगाव (ता. इंदापूर) येथील श्री संत मुक्ताबाई विद्यालयाच्या सुनील शंकर वाघमोडे याने थाळीफेक क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात त्याने हे यश मिळविले आहे. यामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक भारत कांबळे यांनी दिली.
तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर-विसापूर (ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर) येथे नुकत्याच राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी सुनील याने उत्तुंग कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकविला. या यशामुळे सुनीलचे स्कूल कमिटी सदस्य साहेबराव शिंगाडे, भागवत भुजबळ, लक्ष्मणराव शिंगाडे, क्रीडा अधिकारी महेश चावले, पर्यवेक्षक रमेश लोंढे यांनी अभिनंदन केले असून पंचक्रोशीतून त्याचे कौतुक होत आहे. सुनील याला क्रीडा शिक्षक विजय पवार व कैलास जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
0163