निमगाव केतकी येथे पालखी स्वागताची तयारी

निमगाव केतकी येथे पालखी स्वागताची तयारी

Published on

निमगाव केतकी, ता. ७. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मंगळवारी (ता. ९) निमगाव केतकी येथे मुक्कामी येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्थ, विविध पतसंस्था, मंडळे यांनी पालखी सोहळा स्वागताची तयारी केली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदानाची व्यवस्था केली आहे. ग्रामपंचायतीने पालखीतळ, गावठाणात स्वच्छता मोहीम राबविली आहे. पालखी तळावरती मंडप उभारण्यात आला आहे. सराफवाडी चौक, पालखी मैदान या पट्ट्यात स्वच्छता करण्यात आली आहे. निर्मलवारी उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या भागात शौचालयाची व्यवस्था केलेली आहे.
वीज वितरण कंपनीने पालखी काळात २४ तास वीज उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयाने पालखी काळामध्ये २४ तास आरोग्य सेवा देण्याचे नियोजन केले आहे. रुग्णालयामध्ये मुबलक औषधसाठा उपलब्ध असून सर्व प्रकारच्या रुग्णांना या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.